मुंबई : मुंबईतल्या पावसाचा जोर बघता उद्या मुंबईतल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातल्या शाळा उद्या बंद राहणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी ही घोषणा केली आहे. दिवाळीच्या सुट्टीमधून उद्याची सुट्टी कमी करण्यात येणार आहे.


विनोद तावडेंचा शाळा बंद असण्याचं जुनं ट्विट सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालं होतं. या ट्विटमुळे संभ्रम निर्माण झाला होता. पण आता अखेर विनोद तावडेंनी या संभ्रमावर पडदा पाडला आहे.