उष्णता कोरोनाच्या संक्रमणात अडथळा आणणार?
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. काळजी वाटत असतानाच वातावरणात उष्णतेचं प्रमाण वाढत असल्याचं दिसत आहे. काही संशोधकांचा असा दावा होता की, वातावरणातील उष्णता वाढल्यावर कोरोनाचं संक्रमण पसरण्यावर निर्बंध येऊ शकतात. आता अशी आशा व्यक्त केली जात आहे की, वातावरणात उष्णता वाढल्यामुळे आपल्याला फायदा होईल.
मात्र हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अजून उन्हाळा सुरू व्हायला अवकाश आहे. भारताच्या अनेक भागात पुढील दोन आठवडे वातावरण हे सामान्य असणार आहे. आयएमडीचे प्रमुख मृत्यूंजय महापात्राने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि मध्य भारताच्या अनेक भागात दोन-तीन दिवसांत पश्चिमी हवेसोबत पावसाची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर येत्या काळात हिमालयसारख्या क्षेत्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
महापात्र यांनी सांगितल्याप्रमाणे दोन आठवड्याच्या भारताच्या अनेक भागात तापमानात लक्षणीय बदल होणार आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण त्या भागात कमी आहे जिथे उष्णता आहे.