मुंबई : सोशल मीडियावर सध्या एका काकांचा डान्सिंगचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तुम्हाला हा व्हिडीओ पाहायला मिळेल. प्रत्येकजण हा व्हिडीओ शेअर करतोय. या व्हिडीओत काकांनी गोविंदाच्या आप के आ जाने से या गाण्यावर खतरनाक डान्स केला होता. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर याच काकांचा आणखी एक व्हिडीओ येतोय. या व्हिडीओत डान्सिंग काकांनी चढती जवानी गाण्यावर डान्स केलाय. हा व्हिडीओ त्याच पार्टीमधला ज्या पार्टीत त्यांनी पहिला परफॉर्मन्स दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत काका डान्स करतायत तर त्यांची पत्नी बाजूला आहेत. यावेळी त्यांनी डान्स करत काकांना चांगली साथ दिलीये. दुसऱ्याच दिवशी काकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला. या सोहळ्यातील प्रत्येकाने काकांच्या या डान्सची स्तुतीत केली.