मुंबई : Maharashtra ​Congress : बातमी राजकीय विश्वातून. काँग्रेस प्रदेश प्रभारी राज्यातील नेत्यांवर नाराज असल्याचे समोर आले आहे. काँग्रेस ( ​Congress) संघटनात्मक बांधणीवरुन एच. के. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली केल्याची माहिती 'झी 24 तास'ला सूत्रांकडून देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेत्यांसह काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांची काल मुबंईत बैठक झाली. राष्ट्रवादीला विकास निधी अधिक मिळत असल्याने काँग्रेसमधून नाराजी व्यक्त केली. दरम्यान, राज्यात एनसीपी पक्ष संघटनात्मक बांधणी याकडे लक्ष देत असून काँग्रेस पक्षाने प्रदेश पातळीवर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच मुंबई काँग्रेस पक्षाने अधिक चांगले संघटना बांधा, अशा सूचना पाटील यांनी केल्याचे समजते. 


निधी वाटपात राष्ट्रवादीला जास्त वजन मिळते मग काँग्रेस का डावले जाते, यावरून ही नाराजी काँग्रेस नेत्यावर पाटील यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस पक्षही सरकारचा महत्वाचा भाग आहे. हे लक्षात ठेवा आणि सरकार चालवावे अशा सूचना या बैठकीत केल्याचे समजते.