मुंबई : ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar Health) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लता दीदी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. दरम्यान लता दीदींची तब्येत कशी आहे, याबाबतची माहिती त्यांच्या भगिणी आणि गायिका आशा भोसले (Asha Bhosale)  यांनी दिली आहे. (senior singer asha bhosale give reaction lata mangeshkar health update at mumbai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशा ताई काय म्हणाल्या? 


"लता दीदींची तब्येत ठीक आहे. त्या स्थिर आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मला आशा आहे दीदी चांगल्या होतील. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत", अशी प्रतिक्रिया आशा भोसले यांनी दिली. आशा दीदींनी रुग्णालयात जाऊन लता दीदींची भेट घेतली. त्यानंतर त्या रुग्णालयातून बाहेर पडताना माध्यमांशी बोलत होत्या.


दरम्यान,  "लता दीदी उपचारांना प्रतिसाद देत आहेत. आमचं पथक त्यांच्यावर 24 तास लक्ष ठेवून आहे", अशी माहिती दीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दुपारी मेडिकल बुलेटिन दरम्यान दिली.  


भेटसत्र सुरुच 


दिगदर्शक मधुर भांडारकर, माजी रेल्वेमंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लता दीदींची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. दरम्यान अनेक जण दीदींच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी जात आहेत.