शेअर बाजार कोसळला, रुपयाही नव्या निचांकी स्तरावर
रूपयानेही नवा निचांकी स्थर गाठला.
मुंबई: भांडवली बाजारात गुरुवारी पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. आज बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी कोसळला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीनेही ३०० अंकांनी गटांगळी खाल्ली. त्यामुळे सध्या सेन्सेक्स ३३,७७४.८९ च्या पातळीवर पोहोचला. तर दुसरीकडे रूपयानेही नवा निचांकी स्थर गाठला. त्यामुळे आता प्रत्येक डॉलरमागे ७४.४७ रुपये मोजावे लागणार आहेत.
गेले काही दिवस शेअर मार्केटमध्ये पडझड सुरु असतानाच बुधवारी शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्सने ४६१ अंकांची मुसंडी घेतली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला होता. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३ लाख कोटींची भर पडली होती. मात्र, गुरुवारी शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली आणि गुंतवणूकदारांना पुन्हा पडझडीचा फटका बसला.