मोठी बातमी, सिरम इन्स्टिट्यूट Sputnik V लसीचंही उत्पादन करणार!
कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे
मुंबई : सिरम इन्स्टिट्युट सप्टेंबरपासून Sputnik V लसीचंही उत्पादन करणार आहे. यासंदर्भात रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्युट कोविशिल्डसोबतच रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचं देखील उत्पादन करणार आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे.
भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे 30 कोटी डोस तयार करण्याचं उद्दीष्ट असल्याचं स्पुटनिकचे रशियन निर्माती कंपनीनं सांगितलंय. तर इतरही उत्पादन कंपन्या पुढे येत असल्याचं रशियाने सांगितलंय. सध्या भारतात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सीन, स्पुटनिक व्ही आणि मॉडर्ना या चार लसींना मान्यता आहे.
आत्तापर्यंत स्पुटनिक व्ही लसीसाठी जगातल्या 67 देशांमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. जगातली 350 कोटी लोकसंख्या या देशांमध्ये राहाते, असं देखील या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंईतल्या वोखार्ड खासगी हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक व्ही लस द्यायला आजपासून सुरुवात झालीय. अनेक नागरिक स्फुटनिक व्ही या लसीच्या प्रतीक्षेत होते त्यांना अखेर आज ही लस घेता येतेय. विशेष म्हणजे या लसीच्या दोन डोस मधील अंतर हे केवळ 21 दिवसांचं आहे...