जयश्री पाटील यांना मोठा दिलासा, या तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश
गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavrte) यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Pati) अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने जयश्री पाटील यांना मोठा दिलासा दिला आहे. जयश्री यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने पोलिसांना दिल आहेत. (session court give big relief to gunrtna sadavrte wife jayshree patil order not to arrest until 29 april)
एनसीपीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी गावदेवी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी जयश्री यांना आरोपी करण्यात आलं होतं. त्यामुळे पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्या अर्जावर अप्पर सत्र न्यायाधीश आर एम सादरानी निर्णय दिला. त्यामुळे आता पाटील यांना 29 एप्रिलपर्यंत अटक करता येणार नाही.
जयश्री पाटील या गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होत्या. त्या राहत्या घरीही नव्हत्या. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला केव्हाही अटक होण्याची भिती होती. त्यामुळे पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. त्यावर निर्णय देताना न्यायाधिशांनी पाटील यांना तूर्तास तरी दिलासा दिला आहे.
सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती घराण्यासंदर्भात बदनामी करणारं वक्तव्य केलं होतं. तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. याप्रकरणी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सत्र न्यायालायने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, मुंबई, साताऱ्या व्यतिरिक्त सदावर्तेयांच्यावर पुणे, कोल्हापूर, बीड, अकोला या ठिकाणीही गुन्हा दाखल आहे.