मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य कर्मचांऱ्यापाठोपाठ आता महापालिका नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय २ सप्टेंबरपासून लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा पगारात भरघोस वाढ होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या या निर्णयाचा ७ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१९ पासून थकबाकी सोबतच महागाई भत्ता देखील मिळणार आहे.


राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून सातव्या वेतन आयोग लागू करावा यासाठी जोर लावला होता. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना गोड बातमी दिली आहे.


मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेतली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून काही प्रलंबित मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.