मुंबई : मालाड पूर्वेतील गोविंद नगर येथे पोद्दार इंटरनॅशनल शाळेत नर्सरीत शिकत असणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपायाने वॉशरूममध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शाळेतील शिपायाने ५ ऑगस्ट रोजी शाळेतील वॉशरूममध्ये अत्याचार केल्याचे त्या मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शाळेतील मुलीवर लैंगिक अत्याचारामुळे शाळेतील विद्यार्थ्याच्या सुरक्षतेविषयी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 


या घटनेमुळे शाळेतील सर्व पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर पालकांनी रोष व्यक्त केला. पालकांनी रोष व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी पालक वर्गाकडून होत आहे. 


आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हाची नोंद दिंडोशी पोलिसांनी  केली आहे. आरोपीवर या प्रकरणातील आरोपीला दिंडोशी पोलिसांनी अटक केली असून ११ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विनय कुंभार राठोड यांनी दिली