Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अल्पवीयन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं आहे. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 26 वर्षीय आरोपीला जामीन मंजूर केला आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, आरोपीने वासनेतून पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे हे प्रकरण नाही. दोघेही वासनेवर नव्हे तर प्रेमावर आधारित असलेल्या नातेसंबंधात होते, असेही न्यायालयाने म्हटलं. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी जामीन मंजूर करताना सांगितले की, मुलीने स्वेच्छेने तिचे घर सोडले आणि 26 वर्षे वय असलेल्या आरोपीसोबत राहायला गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 26 वर्षीय तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. दिलासा देताना कोर्टाने असे निरीक्षण नोंदवले की, त्यांचे प्रेमसंबंध होते आणि दोघांमधील कथित लैंगिक संबंध हे प्रेमातून नसून वासनेमुळे झाले होते. आता या प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.


नेमकं प्रकरण काय?


पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपी नितीन धाबेराव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 23 ऑगस्ट 2020 रोजी त्यांची 13 वर्षांची मुलगी काही पुस्तके खरेदी करण्यासाठी घरातून निघाली होती. पण ती घरी परत आली नाही. त्यामुळे वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर अल्पवयीन मुलीला शोधण्यात पोलिसांना यश आले. शेजारी राहणाऱ्या नितीनने त्याच्या भावना मला सांगितल्याचे अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले होते. 22 ऑगस्ट रोजी ती आजीच्या घरी गेली होती, त्यावेळी आरोपी नितीनने तिला लग्नाचे वचन दिले. यानंतर अल्पवयीन महिलेने घरातून दागिने आणि रोख रक्कम घेतली आणि नितीनसोबत निघून गेली. या काळात त्यांनी महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी मुक्काम केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


जामीन अर्जदार नितीन दामोदर ढाबेराव याच्यावर कलम 363, 376, 376(2)(एन), 376(3) तसेच आयपीसीच्या कलम 34 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कलम 4, 6 आणि 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नितीनने कोर्टात धाव घेतली होती. नितीनच्या वकिलाने अल्पवयीन मुलासोबत स्वखुशीने आल्याचे कारण देत जामीन मागितला. तर फिर्यादी पक्षाने अल्पवयीन मुलीची संमती संबंधित नसल्याचा युक्तिवाद करून जामीनाला विरोध केला. पीडितेच्या सरकारी वकिलानेही फिर्यादीच्या युक्तिवादाचे समर्थन केले आणि जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी न्यायालयापुढे केली. 


त्यानंतर सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी सांगितले की, जोपर्यंत सक्षमतेचा संबंध आहे, असे मानले जाते की पीडितेचे वय 13 वर्षे आहे आणि तिची संमती संबंधित नाही. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या जबाबावरून पीडितेने घर सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. मित्राकडून पुस्तक घेण्याच्या बहाण्याने ती घराबाहेर पडली आणि परत आलीच नाही. ती आरोपीसोबत गेली. तिच्या जबाबात अल्पवयीन मुलीने आरोपीसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. अल्पवयीन मुलीच्या वक्तव्यावरून असे दिसते की ती आरोपींसोबत अनेक ठिकाणी राहिली होती आणि तिने कोणतीही तक्रारही केली नाही. त्यामुळे प्रेमप्रकरणातून अल्पवयीन आरोपीसोबत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच हे प्रकरण 2020 सालचे असून या प्रकरणात कोणतीही प्रगती झालेली नाही. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्यास वेळ लागेल. हे पाहता आरोपीला आणखी कारागृहात ठेवण्याची गरज नाही. त्याला कारागृहात ठेवून कोणताही हेतू साध्य होणार नाही."


न्यायालयाने काय म्हटलं?


"प्रेमप्रकरणामुळे ती अर्जदारासोबत गेली होती. अर्जदाराचे वयही 26 वर्षे असून ते प्रेमप्रकरणामुळे एकत्र आले आहेत. असे दिसते की, लैंगिक संबंधाची कथित घटना दोन तरुणांमधील आकर्षणामुळे घडली आहे आणि असे नाही की अर्जदाराने पीडितेवर वासनेतून लैंगिक अत्याचार केले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.