मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Sharukh khan's son) मुलाचे नावही मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीमध्ये समोर आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) चौकशी केली. या प्रकरणात एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनसीबी (NCB) ऑफिसमध्ये ताब्यात घेतलेल्या लोकांना मेडिकलसाठी एनसीबी ऑफिस मधून जे.जे रुग्णालयात घेऊन गेले आहेत. 4 जणांना मेडिकल टेस्टसाठी आणण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.


संबधित बातमी: आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुख खानचं हे जुनं वक्तव्य होतंय व्हायरल


एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले की, जेव्हा क्रूझमध्ये छापा टाकण्यात आला तेव्हा शाहरुख खानचा मुलगा आर्यन तिथे उपस्थित होता. NCB ने रात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला होता, जेथे रेव्ह पार्टी चालू होती.


एनसीबीने केलेल्या चौकशीत आर्यनने सांगितले होते की, तो गेस्ट म्हणून या पार्टीला पोहोचला होता. आर्यन म्हणाला की, त्याला पार्टीत सामील होण्यासाठी पैसे द्यावे लागले नाहीत. पार्टीच्या आयोजकांनी लोकांना पार्टीत आमंत्रित करण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर केल्याचा दावा त्यांने केलाय. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनसीबीने आर्यनचा फोन जप्त केला आणि त्याचं चॅट ही तपासलं आहे.


संबधित बातमी: Drugs Case: आर्यन खानसह तिघांना किला कोर्टात हजर केले जाणार


एनसीबीचे डीजी एसएन प्रधान यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, टीमचे 22 अधिकारी साध्या कपड्यांमध्ये प्रवासी म्हणून क्रूझवर गेले होते. जहाजात सुमारे 1800 प्रवासी होते जेथे ड्रग्ज पार्टी करणार्‍या 8 लोकांना पकडण्यात आले. छापा टाकल्यानंतर सर्व लोकांना मुंबई एनसीबी कार्यालयात आणण्यात आले जेथे त्यांची चौकशी करण्यात आली. आता त्यांना अटक करण्यात आली आहे.