आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुख खानचं हे जुनं वक्तव्य होतंय व्हायरल

शनिवारी रात्री म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने मुंबईतील एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला.

Updated: Oct 3, 2021, 06:04 PM IST
आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुख खानचं हे जुनं वक्तव्य होतंय व्हायरल

मुंबई : शनिवारी रात्री म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने मुंबईतील एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या छाप्यात एक मोठे नाव समोर आले आहे आणि ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Sharukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचे.

शाहरुख खानचे वक्तव्य व्हायरल झाले

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात चौकशी केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानचे नावही समोर आले. दरम्यान, शाहरुख खानचे एक जुने विधान खूपच व्हायरल होत आहे, ज्यात त्याने म्हटले आहे की, आपल्या मुलाने ड्रग्ज घ्यावे आणि त्याने आपल्या तरुणपणी जे केले नाही ते सर्व करावे अशी त्याची इच्छा आहे.

शाहरुखची मुलाखत व्हायरल

शाहरुख खान 1997 मध्ये सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये पोहोचला होता. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी गौरी होती. जेव्हा मुलाखतीत शाहरुखशी त्याच्या मुलाबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा शाहरुख म्हणाला होता की, आर्यन 3-4 वर्षांचा झाल्यावर मी त्याला सांगेल की तो मुलींच्या मागे जाऊ शकतो, ड्रग्स घेऊ शकतो आणि सेक्स करू शकतो. आर्यनने सर्व काम लवकर सुरू करावे, जे मी करू शकलो नाही.

शाहरुख दुबईत

शाहरुख खानने आर्यनबद्दल सांगितले होते की, त्याने एक वाईट मुलगा बनले पाहिजे आणि जर तो एका चांगल्या मुलासारखा दिसू लागला तर मी त्याला घराबाहेर काढेल. शाहरुख खानच्या विनोदात सांगितलेली तीच गोष्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. शाहरुख खान सध्या आयपीएलमुळे दुबईत आहे.