मुंबई : राज्यसभेसाठी ( Rajya Sabha Election) राष्ट्रवादीकडून शरद पवार  (Sharad Pawar)आणि फौजिया खान (Fauzia Khan) यांची नावं निश्चित करण्यात आले आहे.  राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी होणार निवडणूक होणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार लढणार आहे. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. यात चार पैकी दोन जागा राष्ट्रवादीला आणि एक शिवसेना, एक जागा काँग्रेसला देण्याचे ठरले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राज्यसभेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी प्रथमच एकत्र लढणार आहे. त्यामुळे पवार आणि खान यांचा राज्यसभा निवडणुकीतील विजय सोपा मानला जात आहे. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. या सातही जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने शरद पवार यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच फौजिया खान यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे.  


राज्यातील राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत. त्यापैकी चार जागा या महाविकास आघाडीच्या वाट्याला येत आहेत. दोन जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत. त्यापैकी दोन जागा राष्ट्रवादीकडे आल्या आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली असून त्यांनी अद्याप राज्यसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. तर भाजपकडून रिपाइंचे नेते रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे.