COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अडचणीत आलेल्या राज्यातील साखर उद्योगांबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईतील साखर संघात  शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होत आहे. साखरेचे विक्रमी झालेले उत्पादन आणि दुसर्‍या बाजूला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे कोसळलेले भाव यामुळे राज्यातील साखर कारखाने अडचणीत आले आहेत. यामुळे ऊस पिकणाऱ्या शेतकऱ्यांचे तब्बल 3200 कोटी रुपयाचे ऊस बिल कारखान्यांकडे थकले आहे. साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी वारंवार राज्यातील कारखान्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र केंद्राने केवळ टनाला 55 रुपये अनुदान जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.


पुढची भूमिका 


या सगळ्या अडचणीतून काय मार्ग काढायचा, पुढील भूमिका काय घ्यायची याबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत साखर संघाची मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे.