Sharad Pawar Health Issue : शरद पवारांचा रुग्णालयातील पहिला फोटो समोर
सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या तब्बेतीची दिली माहिती
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मंगळवारी रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली. पित्ताशयातील खडे काढण्याकरता शरद पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शरद पवारांच्या तब्बेतील अचानक बिघाड झाल्यामुळे सगळीकडे एकच चर्चा झाली. (Sharad Pawar first Photo after operation) असं असताना शरद पवारांचा रुग्णालयातील पहिला फोटो समोर आला आहे.
शरद पवार यांचा हा फोटो त्यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. शरद पवारांच्या तब्बेतीचे अपडेट त्यांनी यामधून दिला आहे. एवढंच नव्हे तर ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार देखील मानले आहे. शरद पवार यांंचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थाच वर्तमानपत्रांचं वाचन करताना दिसत आहे. (Sharad Pawar Health Issue : शरद पवारांच्या प्रकृतीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया)
राष्ट्रवीद काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेवर आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या तब्बेतीबाबत सगळेजणच काळजी करत होते. (Rohit Pawar first reaction on Sharad Pawar Health Issue) त्यांच्यासाठी रोहित पवारांनी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.