Sharad Pawar Health Issue : शरद पवारांच्या प्रकृतीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांवर पित्ताशयांचा स्टोन बाहेर काढण्याकरता शस्त्रक्रिया करण्यात आली 

Updated: Mar 31, 2021, 09:46 AM IST
Sharad Pawar Health Issue : शरद पवारांच्या प्रकृतीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवीद काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेवर आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या तब्बेतीबाबत सगळेजणच काळजी करत होते. (Rohit Pawar first reaction on Sharad Pawar Health Issue) त्यांच्यासाठी रोहित पवारांनी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले रोहित पवार? 

'ब्रीच कँडी' हॉस्पिटलमध्ये आदरणीय Sharad Pawar  साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले. सर्वांनाच काळजी वाटत असली तरी साहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांना लवकर आराम मिळेल. शस्त्रक्रिया करणारे डॉ. मायदेव आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार! 

शस्त्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री Rajesh Tope  साहेबांसह आम्ही पवार साहेबांची भेट घेतली. टोपे साहेबांना पाहून पवार साहेबांनी त्यांच्याकडून इतर विषयांसह राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो!

'ब्रीच कँडी' हॉस्पिटलमध्ये आदरणीय Sharad Pawar साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले....

Posted by Rohit Rajendra Pawar on Tuesday, March 30, 2021

डॉक्टरांच्या देखरेखीखाली शरद पवार

ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि डॉक्टर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, 'राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले. आता काही दिवस ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. या क्षणी, त्याची प्रकृती स्थिर आहे. यासह, डॉक्टरांनी सांगितले की जर भविष्यात त्यांना या ऑपरेशनपासून आराम मिळाला नाही तर भविष्यात पित्ताशयाची स्थितीपाहून शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

एक दिवस आधीच ऑपरेशन

शरद पवार(Sharad Pawar) यांना 29 मार्च रोजी पोटदुखीनंतर ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर पित्ताशयामध्ये समस्या उघडकीस आली. यानंतर, डॉक्टरांनी 31 मार्च रोजी ऑपरेशनसाठी वेळ दिला होता, परंतु मंगळवारी पोटदुखी सुरु झाल्याने त्यांना निर्धारित ऑपरेशनच्या एक दिवस आधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी रात्री उशिरा त्यांच्यावर ऑपरेशन केले.