मुंबई : स्वर्गीय आर. आर. पाटील, आबा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक अतिशय महत्त्वाचे नेतृत्व होते, त्यांची उणीव भरून निघणारी नाही, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची आज (16 ऑगस्ट) जयंती आहे.आर. आर. पाटील यांच्या जयंती निमीत्त त्यांचे स्मरण करत शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून पाटील यांना आदरांजली वाहीली आहे.  'स्वर्गीय आर. आर. पाटील, आबा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक अतिशय महत्त्वाचे नेतृत्व होते, त्यांची उणीव भरून निघणारी नाही. ग्रामोन्नतीचे, व्यसनमुक्त समाजाचे त्यांचे स्वप्न भविष्यात पूर्णत्वास नेण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. आबांसारखे नेते पक्षातील कार्यकऱ्यांसाठी आदर्श ठरतात आणि त्यांच्या कार्याला दिशा देतात. सतत आमच्या स्मरणात राहणाऱ्या आबांना आज त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन!',  अशा शब्दात पवार यांनी आर. आर. पाटील यांना आदरांजली वाहीली आहे.


दरम्यान, अत्यंत सामान्य कुटूंबातू आलेल्या आर. आर. पाटील यांनी राजकारणात घेतलेली भरारी अतूलनीय होती. साधी राहणी, जनमानसाशी जोडलेली नाळ, निश्कलंक वृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास पैलू होते.