Sharad Pawar : मोठा राजकीय भऊकंप येणार अशी जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरु आहे. राष्ट्रावादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. अजित पवारांबाबतच्या चर्चांवर खुद्द अजित पवार आणि त्यानंतर भाजपनेही स्पष्टीकरण दिलं.  मात्र तरीही या चर्चा थांबताना दिसत नाही. अजित पवार यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. शरद पवारांच्या या उत्तरामुळे पुन्हा एकदा नवी चर्चा रंगली आहे (Maharashtra Politics).


राष्ट्रवादीच्याच माजी मंत्र्यांचा गौप्यस्फोट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असा गौप्यस्फोट खुद्द राष्ट्रवादीच्याच माजी मंत्र्यांनी केला होता. निवडणुकीआधी राज्यात भाजप काहीतरी चमत्कार करेल असं विधान राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी केले होते. तेव्हा अजित पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही राज्याच्या राजकारणात काहीतरी शिजतंय अशी चर्चा पुन्हा सुरु झाली.


संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे चर्चेला उधाण


शिवसेनेचे 'सामना' वृत्तपत्रातील रोख ठोक या विशेष मुलाखतीत संजय राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेमुले वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. "कोणालाही भाजपसोबत जायचे नाही, मात्र कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे".  उद्धव ठाकरें यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी ही भूमिका मांडल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.  कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचे संजय राऊत म्हणाले होते. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येवून भूमिका मांडली. 


कुणी फोडायचं काम करत असेल, तर ती त्यांची रणनीती 


कुणी फोडायचं काम करत असेल, तर ती त्यांची रणनीती असेल, आम्हाला काय भूमिका घ्यायची आम्ही घेऊ, मात्र ती भूमिका आज सांगता येणार नाही, असं शरद पवारांनी म्हटल आहे. शरद पवार अमरावतीतल्या कार्यक्रमाला आले असताना त्यांना अजित पवारांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.