मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात ही भेट होणार असून भेटीचं कारण मुंबई क्रिकेट असोशिएशन असल्याचं सांगण्यात आलंय. पण, या बैठकीत राज्यातल्या इतर समस्यांवरही चर्चा होणे अपेक्षित आहे. 


राज्यात होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाला राष्ट्रवादीचा विरोध, येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुका, कर्जमाफीनं उडालेला गोंधळ असे अनेक राजकीय महत्वाचे विषय या भेटीत चर्चेला येऊ शकतात.