मुंबई : Brihanmumbai Municipal Corporation Election : मुंबई महापालिका रणशिंग राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फुंकले आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकरी बैठकीत शरद पवार यांनी सूचक विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणता पक्ष आपल्या सोबत येईल याचा विचार न करता कामाला लागा असे, असे स्पष्ट आदेश यावेळी शरद पवार यांनी दिलेत. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'एकला चलो नारा' दिला गेला. त्यानंतर पवार यांचे विधान महत्वाचे मानले जात आहे. मुंबई पालिकेसाठी तयारी सर्व ठिकाणी करा, असे पवार यांनी सांगितले. 


प्रत्येक 20 दिवसाला वॉर्ड अध्यक्ष यांच्याकडून अहवाल घेतला जाईल. मुंबईत नवाब मलिक यांनी विरोधकांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून मलिक यांच्यावर कारवाई करत आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. अद्याप मलिक यांच्या विरोधात ठोस पुरावे सादर करण्यात आलेले नाही, असे पवार म्हणाले.


दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतः शरद पवार यापुढे वैयक्तिक लक्ष घालणार आहेत. तसे त्यांनी आश्वासन दिले. मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची शरद पवार यांच्या उपस्थितीत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. बैठकीत मार्गदर्शन करताना जयंत पाटील यांनी महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. मुंबईतील घराघरात पोहोचण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश पाटील यांनी दिले. प्रत्येक वॉर्डमध्ये सदस्य नोंदणी वाढवण्याचा सल्ला यावेळेस त्यांनी दिला.