मुंबई : जितेंद्र आव्हाड या विधानसभेतील जागृत सदस्यांला पुजारी नामक धमकीचा फोन आला आहे. याबाबत मुख्यमंत्र्याना पत्र दिले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत टीव्हीजेएच्या कार्यालयाला शुभेच्छा भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा ते बोलत आहेत.


कायद्याचे राज्य नाही... 


हे राज्य कायद्याचे आहे हे म्हणणे धाडसाचे होईल. हे राज्य कुठे चालले आहे असा प्रश्न आहे. एक जाहिरात दाखवली जाते की कुठे नेऊन ठेवला आहे हा महाराष्ट्र असे पुढे म्हणावे लागेल. 


गुजरातमध्ये सरकार विरोधी वातावरण...


गुजरातमध्ये सरकारविरोधी वातावरण दिसत आहे... पण तिथे पैश्याचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे... त्यामुळे निवडणुकीत तिथे काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही.


गुजरातमध्ये थोड्या जागा लढविणार...


निवडणुकीला आम्ही गुजरातमध्ये जाऊ. आम्ही थोड्या जागा लढवत आहोत. काँग्रेसबरोबर चर्चा करू. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस बरोबर प्राथमिक चर्चा झाली आहे. गुजरातमध्ये जे भाजपाच्या विरोधात आहेत त्यांच्याबरोबर जाणार, राज्यात आणि देशांतही त्यांच्यासोबत आहोत. 


राहुल गांधीच्या सभांना गर्दी होतेय 



राहुल गांधी यांची सोशल मीडियावार यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी खूप कूचेष्टा केली... त्याचा परिणाम राहुल गांधींना सहन करावा लागला. पण आता त्याचा उलटा परिणाम दिसायला लागला आहे. राहुल गांधी यांना लोकं स्वीकारतायत... त्यांच्या सभांना गर्दी होत आहे.


नोटबंदीचा परिणाम झाला...


नोटाबंदीचा खूप मोठा परिणाम झाला आहे. फक्त व्यापारीच नाही तर शेतकरीही त्रस्त आहे. उदयोग, रोजगार यावर परिणाम झालाय. जागतिक मंदीच्या काळात नोटाबंदी सारखा निर्णय घेण्यात आला. आता तर ईडी सारख्या यंत्रणा अनेक ठिकाणी लोकांना त्रास देत आहेत. आमच्याकडेही तक्रारी येत आहेत. त्यावर गांभीर्यानं विचार करावा लागेल.



शेतकऱ्यांची आत्महत्या हे देश समोरच गंभीर संकट आहे. आमच्या काळात आत्महत्या झाल्या तेव्हा आम्ही ही बाब गंभीर पणे घेतली , मनमोहन सिंगांना घेऊन मी फिरलो , शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणून 70 हजार कोटी माफी देण्याची मागणी मी केली , कर्जमाफी केली. आज स्थिती उलट आहे , शेतकऱ्यांना शेतमालाला हमी नाही, अनेक समस्या आहेत.


समृद्धीबाबत सरकार धोरण अमानुष 


समृद्धी महामार्गबाबत जमीन अधिग्रहणबाबत सरकार जे करत आहे ती अमानुष पद्धत आहे. माझ्याकडे बळजबरीने जमीन घेत असल्याचं कालच माझ्याकडे एक प्रकरण पुढे आले आहे. यामध्ये ज्याची जमीन आहे त्याला पोलीस स्टेशनमध्ये जबरदस्तीने बसवले होते. जमीन अधिग्रहण जर असेच राहिले तर माझ्या पक्षाला शेतक-यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. 


( मेट्रो 3 बाबत ) दळणवळणच्या दृष्टीने मेट्रो सारखे प्रकल्प आवश्यक आहेत. मात्र ही कामे करतांना पर्यावरण चे नुकसान होणार नाही याकडे बघितले पाहिजे.


टीव्ही चॅनलपासून सावध राहा... 


टीव्ही चॅनेल महत्व मोठे आहे. तुमच्यापासून खूप सावध रहावे लागते कारण एखाद्या पत्रकार परिषदमध्ये नेमके वाक्य तुम्ही टिपता. आणि म्हणून मी माझ्या पक्षातील नवख्या लोकांना सांगितले आहे की यांच्यापासून सावध रहा.