मुंबई : राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत नेमके काय झालं याची उत्सुका होती. मात्र, भुजबळ यांनी भेटी मागचे कारण स्पष्ट केलेय.  छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी या भेटीत प्रकृती संदर्भात चर्चा झाली. पवार यांनी विशेष काळजी घ्या, असे सांगितल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. पवार यांनी वडिलकीच्या नात्याने विचारपूस केली, अशी भुजबळ यांनी माहिती दिली. दरम्यान, सव्वा दोन वर्ष तुरुंगात राहिल्यावर भुजबळांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर केईएममधून गुरुवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला. पवारांनीच जामीन मिळाल्यावर पहिला फोन केल्याचं भुजबळांनी सांगितलं. त्यानंतर आज  भुजबळ शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्वहर ओक निवासस्थानी भेट घेतली.