शरद पवारांचे भाकीत, शिवसेना-भाजपमध्ये युती होणार!
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाही, असे सांगत युतीबाबत शरद पवार यांनी भाकीत केलेय.
मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये युती होणार असल्याचं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलंय. मात्र ही युती केवळ लोकसभेसाठी होईल विधानसभेसाठी नाही असा अंदाजही त्यांनी अनौपचारिक बोलतांना व्यक्त केलाय.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचं आणखी एक नवं भविष्यकथनही पवारांनी केलंय. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत शिताफीने बोलणं टाळले आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन्ही निवडणुका एकत्र होणार असल्याचं भाकित वर्तवलं होतं. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नसल्याचं सांगत एकत्र निवडणूक होणार नसल्याचं नवं भाकित त्यांनी वर्तवलंय.