रुपया मूल्य आणि शेअर बाजारात घसरण कायम
रुपयाचं मुल्य आणि शेअर बाजारांमधली घसरण कायम आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ५०९ अंशांनी कोसळत ३७ हजार ४१३ अंशांच्या महिन्याभरातल्या निचांकावर आलाय.
मुंबई : रुपयाचं मुल्य आणि शेअर बाजारांमधली घसरण कायम आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ५०९ अंशांनी कोसळत ३७ हजार ४१३ अंशांच्या महिन्याभरातल्या निचांकावर आलाय.
धातू, वाहन आणि आर्थिक क्षेत्रातल्या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दी़डशे अंशांनी कोसळून ११ हजार ३००च्या खाली आलाय. तर दुसरीकडे रुपयामधली घसरणही कायम आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ७८ डॉलर प्रति बॅरलवर गेलाय. त्यामुळे डॉलरची मागणी आणखी वाढली आहे. त्यामुळे रुपया आणखी २८ पैशांनी घसरून डॉलरचं मुल्य ७२ रुपये ७३ पैशांवर गेलंय.