2 ऑक्टोबरला `गांधी जयंती`ला Share Market बंद राहणार की सुरु?
Share Market: सप्टेंबर महिन्यातच भारताच्या शेअर बाजाराने चमकदार कामगिरी केली आहे. सेन्सेक्सने 85978.25 च्या नवीन उच्चांकाला स्पर्श केला आहे आणि निफ्टी 50 निर्देशांकाने 26277.35 या नवा उच्चांक गाठला आहे.
Share Market: 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असून या दिवशी बँक हॉलिडे असल्याने शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयं तसंच काही खासगी कार्यालयांनाही सुट्टी असते. पण गुंतवणूकदरांना या दिवशी शेअर मार्केट सुरु राहणार की नाही? हा प्रश्न पडला आहे. तुमच्या माहितीसाठी 2 ऑक्टोबर 2024 रोजी शेअर मार्केट बंद राहणार आहे. उद्या म्हणजेच 2 ऑक्टोबरला देशभरात गांधी जयंती साजरी केली जाईल. यानिमित्ताने बाजार बंद राहील.
कोणतेही व्यवहार होणार नाहीत
शेअर बाजारात उद्या कोणत्याही प्रकारचे व्यवहार होणार नाहीत. शेअर बाजारातील सर्व विभाग, इक्विटी, डेरिव्हेटिव्ह आणि SLB (सुरक्षा कर्ज आणि कर्ज घेणे) बंद राहतील. त्याचवेळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज देखील उद्या सकाळ आणि संध्याकाळी बंद राहतील.
मार्केटचं सुट्ट्यांचं कॅलेंडर
शेअर बाजाराने जारी केलेल्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, चालू कॅलेंडर वर्षात म्हणजेच 2024 मध्ये एकूण 16 दिवस शेअर बाजार बंद राहील. याशिवाय शनिवार आणि रविवारी भारतीय शेअर बाजार बंद राहतात.
1 नोव्हेंबरला पुन्हा शेअर बाजार होणार बंद
2 ऑक्टोबरनंतर शेअर बाजार 1 नोव्हेंबर 2024 रोजी बंद राहील. वास्तविक, दिवाळीचा सण देशभरात 1नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगसाठी भारतीय शेअर बाजार काही तासांसाठी उघडला जातो.
आशियाई स्टॉक मार्केट या दिवशी राहणार बंद
आशियातील बहुतांश बाजार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बंद राहतील. आपला म्हणजेच भारतीय शेअर बाजार 2 ऑक्टोबरला बंद राहणार आहे, तर दुसरीकडे या आठवड्यात चीनमध्ये राष्ट्रीय दिवस साजरा केला जाणार आहे. या व्यतिरिक्त आशियातील आणखी एक म्हणजेच हाँग काँग मार्केट आज म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी बंद होते.
सप्टेंबरमध्ये शेअर मार्केटची स्थिती काय होती?
सध्या सप्टेंबर महिना संपला आहे, या महिन्यात सेन्सेक्स 85978.25 या नव्या उच्चांकापर्यंत पोहोचला. तर निफ्टी 50 निर्देशांकाने 26277.35 चा उच्चांक गाठला.