मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याच्या सूत्रावर सहमती झाल्याचा दावा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यासाठी भाजपवर दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नाही, असे रामदास कदम यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, भाजपकडून रामदास कदम यांचा हा दावा फेटाळण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मिळून घेतील. तसेच युतीच्या जागावाटपाचे सूत्रही अजून निश्चित झालेले नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. 


रिपाईला विधानसभेच्या १० जागा हव्यात; रामदास आठवलेंची मागणी


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनंत चर्तुदशीपर्यंत भाजपा शिवसेनेतील जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांतील चर्चेची पहिला फेरी नुकतीच पार पडली. भाजपाला १६० हून अधिक जागा हव्या आहेत. मात्र, यासाठी शिवसेना ११० पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास शिवसेना तयार नाही. त्यामुळे जागावाटपाकडे सर्व उमेद्वारांचे लक्ष लागले आहे.


जागावाटप फॉर्मुला : भाजपा-शिवसेनेचे या गोष्टीवर एकमत


नुकत्याच झालेल्या केंद्रीय पातळवरील सर्वेक्षणात निवडणुकीत भाजपाला स्वबळावर १६० जागा मिळतील आणि महायुतील २२९ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे भाजपाला १६० जागा, शिवसेनेला ११० जागा आणि मित्रपक्षांना १८ जागा असाच महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे.