मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून मराठा आरक्षणासाठी निरनिराळे पर्याय मांडले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सोमवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. यावेळी उद्धव ठाकरे मराठा आरक्षणासंदर्भात आमदारांची मतं जाणून घेतील. 
 
  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही विधीमंडळ पक्षाची बैठक विधानभवनात बोलावली आहे. आधी दोन्ही पक्षांची वेगवेगळी बैठक होईल. त्यानंतर दोन्ही पक्षांची एकत्र बैठक होईल. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारवर कशा प्रकारे दबाव टाकायचा, त्याचबरोबर राज्यभर सुरू असलेल्या मराठा आंदोलनासंदर्भात काय भूमिका घ्यायची याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.