`कितीही अफझल खान आले तरी...` उद्धव ठाकरे यांची अमित शहांवर टीका
सत्तासंघर्ष सुनावणीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मॅरेथॉन सुनावणी सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाला (Election Commission) सुनावणीचा अधिकार आहे की नाही यावर ठाकरे आणि शिंदे गटाच्या (Thackeray Group vs Shinde Group) वकिलांमध्ये खल सुरू आहे. ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल (Adv. Kapil Sibbal) यांनी युक्तीवाद केलाय. तर शिंदे गटातर्फे कौल यांनी बाजू मांडली. पक्ष चिन्हं ही आमदारांची मालमत्ता नाही तर हा निवडणूक आयोगाचा निर्णय असतो असा युक्तीवाद कौल यांनी केलाय.
उद्धव ठाकरे यांची अमित शहांवर टीका
दरम्यान राज्यातील सत्तासंघर्षावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप नेते अमित शहांवर (Amit Shah) जोरदार टीका केली आहे. कितीही अफझलखान आले तरी घाबरणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आई भवानीचा आपल्याला आशीर्वाद आहे. त्यामुळे न्यायालयीन सुनावणीत विजय आपलाच होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. धाराशिवमधून (Dharashiv) आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय.
विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही?
शिंदे गटाला इतर पक्षात विलीनकरण करण्यापासून पर्याय नाही हा मुद्दा ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आण कपिल सिब्बल लावून धरला. हे प्रकरण दहाव्या सूचीच्या पलीकडील हे प्रकरण आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकले नाहीत असं कोर्टाने म्हटलंय.