मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आता पक्षाच्या चिन्हावरून संघर्ष सुरू झाला आहे. आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण चिन्हं जाणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चांना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनुष्यबाणाबाबत कोणताही संभ्रम ठेवू नका. कारण धनुष्यबाण हे चिन्हं शिवसेना पक्षाचं आहे. हा वादावर न्यायलयात लढाई सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय जो काही लागेल तो लागेल. पण धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचं आहे. 


शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरु आहे. कायद्यात नमुद केलं आहे त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. नुसतं धनुष्यबाण चिन्ह बघत नाहीत तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाचं चिन्ही लोकं बघतात. नवीन चिन्हाचा विचार करण्याची आम्हाला गरज नाही. घटनात्मक चर्चा करुनच मी ही ठामपणे सांगतोय.


दुसरीकडे धनुष्यबाण चिन्हबाबत लढाई न्यायालयात सुरु आहे. कायद्याच्या लढाईत अपयश आलं तर गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवं चिन्ह मिळेल त्या चिन्हाची तयारी ठेवा, असे आवाहन ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. नवं चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा, असेही आवाहन ठाकरेंनी दिल्याची चर्चा आहे. 


 न्यायालयीन लढाई सुरु आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. काही जण याबाबत अफवा पसरवत आहेत. कायद्याच्या कसोटीवर चिन्हं जात नाही. आम्ही याबाबत वारंवार बोललो आहोत, असे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी आधी प्रतिक्रिया दिली होती.