शिवसेनेचे प्रतिक्षा नगरचे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचं निधन
आज भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद असून यातच शिवसेनेसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे.
मुंबई : आज भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद असून यातच शिवसेनेसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे.
सायन प्रतिक्षा नगर वार्ड क्रमांक १७३ चे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचं आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेचा एक नगरसेवक कमी झाला आहे. प्रल्हाद ठोंबरे यांच्यावर काही दिवसांपासून केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यानच त्यांचे निधन झाले. त्यांच्या रक्तात साखर जास्त झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.