कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेकडून संजय मोरेंना उमेदवारी
मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई, कोणक पदवीधर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत मुंबईतल्या शिवसेना भवनात बैठक सुरू आहे. या बैठकीला कोकणातील सर्व मंत्री आमदार आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. निवडणुकीतल्या रणनितीसंदर्भात या बैठकीत चर्चा सुरू आहे.
मुंबई पदवीधरसाठीही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनाच चौथ्यांदा उमेदवारी देणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोकण पदवीधर मतदार संघासाठी ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांचे नाव उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी बैठकीत जाहीर केलंय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या निरंजन डावखरे यांना संजय मोरे यांचं आव्हान असणार आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये शिवाजी शेंडगे यांचे नाव आधीच जाहीर करण्यात आलंय.