मुंबई : भाजपला जोरदार दणका बसला आहे. महापालिकेतील संख्याबळ कमी झाले आहे. मात्र, त्याचवेळी शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. निवडणुकीत दिलेले जात प्रमाणपत्र बोगस निघाल्याने भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांचे पद रद्द झाले आहे. त्यामुळे भाजपची संख्या कमी झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महानगरपालिकेत शिवसेनेचे संख्याबळ आता ९७ वर पोहोचले आहे. अंधेरी पूर्व विभागातील वॉर्ड क्रमाक ८१ मधील भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र बोगस ठरल्यामुळे, मुंबई उच्च न्यायालयाने मुरजी पटेल यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले होते. 




त्याची अंमलबजावणी करत मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांचं नगरसेवकपद रद्द करून, दुसऱ्या क्रमांकावर असलेले शिवसेना उमेदवार संदीप नाईक यांना नगरसेवकपद जाहीर केले. यामुळे मुंबई महानगरपालिकेतलं शिवसेनेचे संख्याबळ आता ९७ झाले आहे.