शिवसेना नेते रामदास कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !
Ramdas Kadam News : शिवसेना नेते रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या दोन मुलांच्या कंपनीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी आता 15 जूनला होणार आहे.
Ramdas Kadam News : शिवसेना नेते रामदास कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण रामदास कदम यांच्या दोन मुलांच्या कंपनीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आमदार योगेश कदम (Yogesh Kadam ) आणि सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) हे योगीसिद्धी डेव्हलपर्समध्ये भागिदार आहेत. या कंपनीने मुंबईच्या कांदिवलीत इमारतीचा पुनर्विकास करताना कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणी पार पडली. पुढील सुनावणी आता 15 जूनला होणार आहे.
रामदास कदम यांच्या दोन मुलांच्या कंपनी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मेसर्स योगीसिद्धी डेवेलपर्स या कंपनी विरोधात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, रामदास कदम यांचे दोन्ही मुले योगेश कदम आणि सिद्धेश कदम दोन्ही योगीसिद्धी डेव्हलपर्समध्ये पार्टनर आहेत. या कंपनीने कांदिवली स्थित सिटीएस 147 वर एसआरए योजनेअंतर्गत सुमुख हिल्स नावाच्या इमारतीचा पुर्नविकास केला आहे. मात्र या इमारतीमध्ये कायद्याची पायमल्ली करण्यात आल्याचा याचिकेत गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सोमवारी या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायाधीश गंगापूरवाला यांच्यासमोर सुनावणी झाली. मात्र याचिकाकर्त्याला सुनावणी पूर्वी एक लाख रुपये जमा करण्याचे कोर्टाने निर्देश दिले आहेत. ही रक्कम जमा करण्यासाठी याचिकाकर्त्याला तीन आठवड्यांची मुद्दत देण्यात आली आहे. याप्रकरणीं पुढील सुनावणी 15 जून रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्ता तर्फे वकील प्रज्ञा तळेकर यांनी युक्तिवाद केला आहे.