मुंबई : Sanjay Raut  on Over Central Agencies Actions : केंद्रातील भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे. केंद्रीय एजन्सींना पाठीमागे लावण्याचा धडाका सुरु लावला आहे. हे कधीपर्यंत तुमचे सुरु राहणार आहे? 2024 पर्यंत चालेल, त्यानंतर काय? आम्ही काही वाकणार नाही, असे थेट इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. त्यांनी तसे ट्विट केले आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्याचे मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे. ही सरकारे झुकणार नाही, असे त्यांनी सांगण्याचा ट्विटमधून प्रयत्न केला आहे. (Shiv Sena Leader Sanjay Raut Allegations Over Bjp Over Central Agencies Actions)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप राज्यात ईडी, सीबीआय आणि एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे किती दिवस चालणार. तुमचे जे चाललंय ते चालू दे. पहले  लालच दिया गया, ऑफर्स दिए । फिर डराया , धमकाया गया। तब भी  झुका नहीं तो  परिवार को धमकाया गया।  हमने कहा- छोड़ दो, नजरअंदाज करो इन्हें, जाने दो। तो अब सेंट्रल एजेंसी को हमारे पीछे लगा दिया। चलता है, असे म्हणत आम्ही घाबणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.


दरम्यान, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही भाजपवर आरोप केला आहे. आम्ही कितीही काही केले तरी झुकणार नाही. ईडी लावण्याचा प्रयत्न केला तरी, सरकार झुकणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला.



महाराष्ट्रात आघाडी सरकार झुकत नाही हे लक्षात येताच, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख असतील किंवा आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई करुन अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळे डाव भाजप खेळत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. 


देशात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरुन पाच राज्यांतील निवडणुकीतून हे सगळे समोर येणारच आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर जास्त दिवस चालणार नाही, अशी खात्रीही नवाब मलिक यांनी व्यक्त केली. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट केल्याने अधिक चर्चा सुरु झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय तपास यंत्रणाकडून छापे मारण्यात आलेत. आता राज्यात काही ठिकाणी छापेमारी मारण्यात येत आहेत. यावरुन संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.