मुंबई : Sanjay Raut's press conference : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला आणि किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे. शिवसेनेच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर ईडी आणि आयकर विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, हा नवलानी कोण आहे आणि सोमय्या यांनी वाधवान याच्यासोबत पार्टन कसे ? आदी सवाल आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केले. त्याचवेळी त्यांना कारवाईचा इशाराही दिला आहे.


आयटीची भानामती, 'आम्ही रेड टाकणार आणि घुसणार' - संजय राऊत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवलानी यांचा किरीट सोमय्या यांच्या सोबत काय संबंध आहे. मुंबईतील 10 बिल्डर कडून कन्सल्टन्सी फी घ्यायचा. दिल्ली, मुंबईमधून हे रॅकेट चालवले जाते आहे. या रॅकटमध्ये भाजपच्या नेत्यांचा समावेश आहे. नवलानी यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्त यांना या खंडणी विरोधात एफआयआर केस नोंदवणार आहोत. ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार यात भाजपचे लोक सहभागी झाले आहेत. क्रिमिनल सिंडीकेट नेक्सेससाठी मुंबई पोलीस तपास आजपासून सुरू झाला आहे.


ज्या ईडीला तुम्ही राजकीय विरोधकांच्या मागे लावली आहे. ईडीचे लोक बिल्डर डेव्हलपर यांना घाबरते. पैसे लुबाडले जातात, ही माहिती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. जितेंद्र नवलानी याने  100हून अधिक बिल्डर  डेव्हलपर यांच्याकडून धमकावून पैसे  लुबाडले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.


नवलानी हे इडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत २०१७ मध्ये इडी ने दिवान हाऊसिंग सोसायटी ची चौकशी केली  तेव्हा नवलानी यांनी १० कोटी यांना ७ कंपनीत भोसले यांनी पैसे पाठवले


नवलानी यांचा किरीट सोमय्या यांच्या सोबत काय संबंध आहे. मुंबईतील 10 बिल्डर कडून कन्सल्टन्सी फी घ्यायचा. या रॅकटमध्ये भाजपाच्या नेत्यांचा समावेश आहे. नवलानी यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्त यांना या खंडणी विरोधात एफआयआर केस नोंदवणार आहेत. दिल्ली, मुंबईमधून हे रॅकेट चालवलं जातं आहे. ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहोत. यात भाजपचे लोक सहभागी झाले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.


सोमय्या आणि वाधवान बिजनेस पार्टनर कसे झालेत?



जून 2015 लाख किरीट सोमय्या यांनी जीव्हीके कंपनीवर एअरपोर्ट जमिनी हडपली या बाबतीत तक्रार केली.  मुंबई पोलीस तक्रार करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. किरीट हा सिरीयल कंम्पलेनंट आहे. किरीट सोमय्या महान आत्मा आहे. सगळ्यांबाबत प्रश्न विचारता, पीएमसीए बॅंक अणि वाधवान बिल्डर यांचे संबंध काय, हा प्रश्न मी विचारला होता, असे राऊत म्हणाले.


एक वर्ष त्यांनी या घोटाळ्यात तक्रार केली. या घोटाळ्यात वाधवान विरोधात तक्रार केली. राकेश वाधवान यांना सोमय्यांनी बॅकमेल केले आणि हजारो कोटींची जमीन ताब्यात घेऊन बिजनेस पार्टनर बनले, असा आरोप राऊत यांनी सोमय्यांवर केला.


सोमय्या बाप-बेटे जेलमध्ये जाणार आहेत. पुढच्या पत्रकार परिषदेवेळी  मी तपास यंत्रणंचा छडयंत्र करणारे सूत्रधार कोण हे स्पष्ट करणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. किरीट सोमय्या जेलमध्ये जाणार आहे. राकेश वाधवानच्या प्रॅापर्टी बद्दल कारवाई तपास होणार आहे. सोमय्या  यांनी हजारो कोटींची जमीन ताब्यात घेऊन बिजनेस पार्टनर बनले, असा आरोप यावेळी राऊत यांनी केला.