मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चे निकाल हाती येत आहेत. निकालांतून आतापर्यंतचं चित्र हे जवळपास स्पष्ट झालंय. राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना युतीचं सरकार येईल असं म्हटलं जात आहे. परंतु संपूर्ण निकालाआधीचं भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ होत असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी, मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाशी बोलणी करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात शिवसेना आणि भाजपाचं सरकार येणार आणि भाजप - शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या. आमची युती असून दोघे मिळून सरकार बनवू. आधीपासून ५०-५० चा फॉर्म्युला ठरला आहे आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठीही चर्चा होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.


निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये यावेळी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं शिवसेनेकडून सतत सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरवला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आदित्य ठाकरे हे ६७ हजार ६७२ मतांनी विजयी झाले आहेत.


भाजपाला सर्वाधिक मतं मिळाल्याचं चित्र असलं तरी त्यांना पाहिजे तेवढं बहुमत मिळालेलं नाही. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, भाजप १०३, शिवसेना ५९, काँग्रेस ४२, राष्ट्रवादी काँग्रेस ५५ आणि इतर उमेदवार २९ जागांवर विजयी ठरले आहेत.