मुंबई : Shiv Sena leader Yashwant Jadhav's problems increased : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जाधवांसह कंत्राटदारांच्या 35 ठिकाणांवर छापेमारी मारण्यात आली आहे. 130 कोटी रूपयांची संपत्ती, 36 स्थावर मालमत्ता गोत्यात आल्या आहेत. हवालामार्फत आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Shiv Sena leader Yashwant Jadhav's problems increased, raids were carried out at 35 places)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशवंत जाधव यांच्या घरी मोठे घबाड सापडले होते. 35 ठिकाणी छापेमारीत 130 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मुंबई मनपा संबंधित आयकर खात्याने केलल्या छाप्यात डिजीटल पुरावे आणि कागदपत्रे सापडली आहेत. 


संबंधित कंत्राटदार आणि काही बीएमसीच्या महत्वाच्या व्यक्तींसह 35 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. आंतराष्ट्रीय हवाला मार्फत व्यवहार झाल्याचे दिसून येत आहेत. करोडो रूपये ज्यांचा हिशोब लागत नाही. कंत्राट मिळवण्यासाठी काहीना झुकते माप दिले. त्यातून व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. जाधव यांच्या घरातून दोन कोटींचे सोने दागिने, दीड कोटी रोख रक्कम जप्त केले गेले आहेत.