मुंबई : शिवसेना अखेर सायंकाळी 7 च्या आधी सत्तास्थापनेचा दावा करणारं पत्र राज्यपालांना देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपाने आपल्याकडे सत्तास्थापन करण्यासाठी संख्याबळ नसल्याचं राज्यपालांना सांगितल्यानंतर, राज्यपालांनी शिवसेनेला आज सायंकाळी साडेसातपर्यंतची वेळ दिली आहे. पण त्याआधीच शिवसेना, पत्र देऊन सत्तास्थापन करण्याचा दावा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा सत्तास्थापनेच्या मैदानातून बाहेर झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत अगदी शेवटच्या क्षणी शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचं दिसून येत आहे.


शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच काही अपक्षांचाही पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे. यात काँग्रेस सत्तेत सहभागी असणार आहे की, बाहेरून पाठिंबा देणार आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.


दुसरीकडे शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे, कारण शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे वांद्रे येथील ताज लॅण्डस हॉटेलला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा होत आहे.