मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत निवडणुकीतल्या पक्षाच्या कामगिरीवर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. शिवसेनेच्या जागा घटल्यामुळे किशोर यांच्या रणनीतीबाबत शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवल्या. पण दोन्ही पक्षांनी केलेला दावा फोल ठरला. दोन्ही पक्षाच्या जागा कमी झाल्या. शिवसेनेच्या एकूण  शिवसेनेसाठी यंदा रणनीती आखणारे प्रशांत किशोर यांच्यावर पक्षातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. किमान ७५ आमदार निवडून आणण्याचा I-pac चा उद्देश होता. त्यामुळे यापुढे प्रशांत किशोर यांची संस्था I-Pac ला यापुढे आदित्य ठाकरे यांच्यासाठी काम करण्याची जबाबदारी काढून घेतली जावू शकते.


निवडणुकीचा निकाल आल्यानंतर प्रशांत किशोर यांच्या संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींसोबत आदित्य ठाकरेंनी चर्चा केली. पण सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे हे देखील I-Pac च्या कामावर नाराज असल्याचं बोललं जातं आहे.