मुंबई : शहरातील लोअर परेल भागात शिवसेना कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मोठा राडा पाहायला मिळाला. दरम्यान, पोलिसांनी वेळीच मध्यस्ती केल्याने अनर्थ टळला. मात्र, यावेळी धक्काबुक्की करण्यात आली. लोअर परेल येथील धोकादायक असल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. मात्र, वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी पर्यायी सेवा नसल्याने हा पूल बंद करु नये, अशी अनेकांची मागणी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, लोअर परेल स्थानकातून बाहेर पडण्यासाठी फक्त एक पूल उपलब्ध आहे. मात्र, तो अरुंद आहे.  या पुलाची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त, रेल्वे अधिकारी जाणार होते. त्याआधी शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते पुलाची पाहाणी करण्यासाठी आले. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार सुनील शिंदे यांनी केलाय. मनसे कार्यकर्त्यांनी या दौऱ्यात घुसखोरी केल्याचा दावा आमदार सुनील शिंदे यांनी केलाय.



२४ जुलैपासून लोअर परेलचा रेल्वे पूल वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, याला विरोध होत आहे. हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे.