मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर, राष्ट्रवादीचा आताचा सर्वात जवळचा पक्ष शिवसेनेने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, शरद पवार हे पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच आहे, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर शिवसेनेला आनंदच होणार असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.


ही बाळासाहेब ठाकरेंचीच इच्छा होती - अरविंद सावंत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार  पंतप्रधान झाल्यास शिवसेनेला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केलीय. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, ही बाळासाहेब ठाकरेंचीच इच्छा होती, असंही त्यांनी सांगितलं.


या भेटीकडे फार लक्ष देण्याची गरज नाही - संजय राऊत


प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीकडे फार लक्ष देण्याची गरज नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितला आहे. नंदुरबार येथे ते बोलत होते. 


शरद पवारांना अनेक जण भेटत असतात - अजित पवार


तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही स्पष्टीकरण दिलंय. शरद पवारांना अनेक जण भेटत असतात. शरद पवार यांनी निवडणूक लढणार नसल्याचं अगोदरच स्पष्ट केल्याचं अजित पवारांनी सांगितलं.