परिचारिकांच्या मुद्यावरून सेना आक्रामक, विधानभवनाच्या पायर्यांवर घोषणाबाजी
भारतीय जवानांच्या पत्नींबाबत वादाग्रस्त विधान करणारे आमदार प्रशांत परिचारिक यांच्या मुद्यावरून शिवसेना आमदारांनी आज आंदोलन केलं.
मुंबई : भारतीय जवानांच्या पत्नींबाबत वादाग्रस्त विधान करणारे आमदार प्रशांत परिचारिक यांच्या मुद्यावरून शिवसेना आमदारांनी आज आंदोलन केलं. शिवसेना विधानभवनाच्या पायर्यांवर आमदारांची घोषणाबाजी केली. तसेच, प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिवसेना आमदारांची मागणी केली.
शिवसेना आक्रामक
सैनिकांचा अवमान सहन केला जाणार नाही, असे सांगत विधानसभेत शिवसेनेचे आमदार परिचारकांच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. कालही परिचारक यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आमदार आक्रामक झाले होते. त्यानंतर दोन्ही सभागृहात झालेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं होतं.
पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
सरकार परिचारकांना पाठिशी का घालते आहे. हा सैनिकांच्या अवमान आणि महिलांच्या अवमानाचा मुद्दा आहे. परिचारिकांबाबत सरकार काय भूमिका घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी. याबाबत विधानसभेच्या भावना तीव्र आहेत, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
‘हा जवानांच्या पत्नींचा अवमान’
प्रशांत परिचारक यांच्या विधानावर सर्व जनतेच्या तीव्र भावना आहेत. जवान आणि त्यांच्या पत्नींचा हा अवमान आहे. याबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी, असे जयंत पाटील म्हणाले.
कामकाज तहकूब
आजचा दिवस संपण्याआधी सरकारने खुलासा करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे सरकारला निर्देश दिले आहेत. शिवसेना आमदारांसह विरोधी पक्षाच्या आमदारांची वेलमध्ये धाव घेतली. भाजपा वगळता सर्व पक्षीय आमदारांची विधानसभेत घोषणाबाजी केली. त्यानंतर विधानसभेचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.