Manohar Joshi health deteriorated : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची विचारपूस करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णलयात विचापूस करण्यासाठी दाखल झालेत. कालपासून मनोहर जोशी यांना बरे वाटत नव्हते. त्यामुळे हिंदुजा रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक म्हणून मनोहर जोशी यांची ओळख आहे.  गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. काल संध्याकाळी मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. हिंदुजा रुग्णालयताली डॉक्टरांकडून लवकरच मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जाणार आहे.


शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित


नोहर जोशी हे मुळचे मराठवाड्याचे. ते मूळ बीडचे रहिवासी. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. त्याचे  M.A. L.L.B शिक्षण झाले आहे. M.A. झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळाली. त्याआधी त्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता.  


त्यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौर होते. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते शिवसेनेच पहिले मुख्यमंत्री बनले. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यावर त्यांना लोकसभेत बढती मिळाली. ते लोकसभेचे सभापतीही होते.


मनोहर जोशी यांची राजकीय कार्यर्कीद 


गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, राज्यसभा सदस्यपद आणि  लोकसभा अध्यक्ष ही पदे भुषवली आहेत.