मुंबई :  महाराष्‍ट्रातील शेतक-यांवर होणारा अन्‍याय, त्‍यांच्‍या विविध समस्‍या, कर्जमाफी  यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्‍यांना न्‍याय देण्‍यासाठी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना पदाधिकारी तालुकानिहाय प्रत्‍यक्ष शेतक-याची भेट घेऊन त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेणार आहेत. समस्‍या संग्रहीत केल्‍यानंतर याबाबतचे निवेदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्‍यमंत्री महोदय यांना सादर करणार आहेत.



जिल्‍हानिहाय विविध नेते, उपनेते, पदाधिकारी यांची नेमणूक केली असून त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍थानिक जिल्‍हाप्रमुख, तालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी याबाबत माहिती संकलीत करण्‍याची कार्यवाही करणार आहेत. शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर यांचेकडे पश्चिम महाराष्‍ट्रातील पुणे (ग्रामीण), कोल्‍हापूर, सांगली, सोलापूर, नगर, सातारा या जिल्हयांची जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे.



बुधवार दि. 7 जून रोजी दुपारी 3-00 वाजता पुण्‍याई सभागृह, मोरे विद्यालय चौक, पु.ना.गाडगीळ ज्‍वेलर्स समोर, पौड रोड, कोथरूड, पुणे येथे वरील जिल्‍ह्यांचे जिल्‍हाप्रमुख व तालुकाप्रमुख यांची खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित केली आहे.