मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Assembly Constituency Bye Election) दिवगंत आमदार रमेश लटके (Ramesh Latke Wife) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (shiv sena uddhav thackeray give candidature to late ramesh latke wife rutuja latke for andheri east assembly constituency bye election 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरी पूर्वेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळेस उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. रमेश लटके याचं 12 मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तेव्हापासून मतदारसंघ रिक्त आहे. 


भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात


भाजपकडूनही या पोटनिवडणुकासाठी उमेदवार दिला जाणार आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी मिळणार आहे. विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीची जबाबदारी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना देण्यात आली आहे.


कोण आहेत मुरजी पटेल? (Who is Murji Patel)


पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक राहिले आहेत. पटेल 2019 मध्ये लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 


राज्यात 2019 मध्ये शिवसेना-भाजप यूती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती.


या निवडणुकीत रमेश लटके यांनी पटेल यांचा 16 हजार 965 इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मात्र उल्लेखनीय बाब अशी की अपक्ष निवडणूक लढवूनही पटेल यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. पटेल यांना 45 हजार 808 मतं मिळाली होती.


पटेल 'जीवन ज्योत प्रतिष्ठान' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घराघरात पोहचले आहेत. त्यांची आपल्या भागावर घट्ट अशी पकड आहे. त्यांना मानणारा आणि जाणणारा असा एक वर्ग आहे.