मुंबई : पालघर पोटनिवडणुकीतमध्ये भाजप आणि शिवसेनेतील संबंध खूपच ताणले गेले आहेत. युतीमधील तणाव खूपच वाढला होता. जाहीर सभांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत होते. यातच पालघर पोटनिवडणुकीतील पराभव शिवसेनेला जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर आता उद्धव ठाकरे काय भूमिका करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना आता सत्तेतून बाहेर पडणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. उद्धव ठाकरे थो़ड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्याआधी मातोश्रीवर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक देखील झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना सत्तेत असूनही भाजपवर टीका करत होती. सरकारवर टीका करण्याची कोणतीच संधी शिवसेना नेते सोडत नव्हते. अनेकदा आता शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असा चर्चा रंगल्या पण तसं काहीही झालं नाही. आता या चर्चांना पुन्हा एकदा उधान आलं आहे. आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


पालघर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा विजय झाला आहे. पालघर पोटनिवडणूक राजेंद्र गावित यांचा ४४ हजार मतांनी विजय झाला आहे. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना २ लाख ३७ हजार मतं पडली आहेत. गावित यांना २ लाख ६३ हजार मतं पडली आहेत. जनतेच्या पाठिंब्यामुळे आपला विजय झाला असल्याचं राजेंद्र गावित यांनी म्हटलं आहे. पालघरमध्ये भाजपने जोरदार सेलिब्रेशन सुरू केलं आहे.


भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. शिवसेनेने चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली. तर भाजपने काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांना आपल्या पक्षात घेत उमेदवारी दिली. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना भाजप यांच्यात चांगलीच जुंपली. शिवेसेनेने मुख्यंत्र्यांची क्लिक जाहीर करुन पोटनिवडणुकीत भाजपला उघड पाडण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेने अर्धवट क्लिप दाखवून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.