उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट, शिवसैनिकांनी केले युवकाचे मुंडण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्धल एका युवकाचे शिवसैनिकांनी मुंडण केले.
मुंबई : समाज माध्यमांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्धल वडाळा येथील एका युवकाचे शिवसैनिकांनी मुंडण करत त्याला मारहाण केली. फेसबूकवर मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. हिरामणी तिवारी या युवकाने ही फेसबूकवर केल्याची माहिती मिळताच शिवसैनिक संतप्त झालेत. त्याचे घर हुडकून त्याला चांगली समज दिली. मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपहार्य पोस्ट लिहिल्याबाबत शिवसैनिकांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याचे मुंडण केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व कायद्याविरुद्ध देशभरात आंदोलनानंतर टिपन्नी केली होती. अशाच आंदोलनादरम्यान दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथे पोलिसांनी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केला होता. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटल. जामियाची घटनेचा जालियावाला बाग़ हत्याकांडाशी तुलना केली होती. यावर हिरामणी तिवारी याने फेसबुकवर एक आक्षेपार्ह विधान केले होते.
याचा राग शिवसैनिकांना आला आणि त्यांनी हिरामणी तिवारीला मारहाण केली. त्यानंतर हिरामणी यांने याबाबत वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसात समाधान जुकदेव आणि प्रकाश हवे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. याबाबत गुन्हा करण्याची प्रक्रिया सुरु होती, याची माहिती हिरामणी तिवारी याने दिली. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही पक्षांना १४९ ची नोटीस पाठवली आहे.