मुंबई : भाजपने माजी मु्ख्यमंत्री नारायण राणेंना दिलेल्या राज्यसभेच्या खासदारकीच्या ऑफरबाबत शिवसेनेनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. दरम्यान, राणेंना मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा विरोध केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी नारायण राणेंना ऑफर स्वीकारू द्या, मग काय ते पाहू अशी प्रतिक्रिया शिवसेनेतून उमटली आहे. नारायण राणेंना राज्य मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे  भाजपनं राणेंचं राज्यसभेत पुनर्वसन केल्यास शिवसेंनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. 


राणेंना सेनेचा विरोध असल्याने त्यांना केंद्रात पाठविण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये अनेकांची नावं पुढं आली आहेत. राज्याच्या कोट्यातल्या सहा जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे यातून राणेंना खासदारकी देण्याची ऑफर पुढे आलेय.


दरम्यान, संख्याबळानुसार भाजपच्या तीन जागा सहज निवडून येवू शकतात. त्यामुळं आता या तीन जागांसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर इतर दोन जागांसाठी पाच जणांची नावं चर्चेत आहेत.