मुंबई : मुंबईतून भीम आर्मीच्या १२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.  शिवाजी पार्क पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चैत्यभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय. यावर्षी १ जानेवारीची रोजी कोरेगाव भिमामध्ये उसळलेल्या दंगलीनंतर पोलीस यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी शिव प्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केलीय. गेल्या वर्षी १ जानेवारी रोजी कोरेगाव भिमा हिंसाचारात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावरही आरोप झाले होते. त्यामुळे या सर्व आरोपींवर विविध कलमान्वये पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलीय. या दोघांना २ जानेवारी पर्यंत जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घाण्यात आली आहे. १ जानेवारीला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनीही कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.


शौर्य दिनाला गालबोट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमाच्या लढाईत ८०० दलितांनी इंग्रजांकडून लढत बाजीराव पेशव्यांच्या २७ हजार सैनिकांना हरवलं होतं. हाच दिवस 'शौर्य दिवस' मानत दरवर्षी हजारो नागरीक कोरेगाव भिमाजवळच उभारल्या गेलेल्या 'विजय स्तंभाला' अभिवादन करण्यासाठी जमतो. या सोहळ्याला गालबोट लागले आणि याचे पडसाद राज्यभरात उमटले.या हिंसाचारानंतर प्रथम भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी करण्यात आली.


आरोप-प्रत्यारोप 


 दलित समाजाविरोधात हिंसा भडकावण्याचा आरोप आंबेडकरांनी केला होता. त्यानंतर कोरेगाव भिमाचा हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचं सांगत ३० डिसेंबर २०१७ रोजी परिसरातील सोनई हॉटेलमध्ये मिलिंद एकबोटे यांनी बैठक घेतल्याचा आरोप सत्यशोधन समितीने केला होता. या हिंसाचाराचे पडसाद पुढचे कित्येक दिवस महाराष्ट्रभर उमटताना दिसले या सर्व पार्श्वभूमीवर एकबोटे-भिडेंवरील ही कारवाई महत्त्वाची मानली जातेय. तसेच राज्यभरात अतिसंवेदनशील ठिकाणी पोलीस सतर्क झाले आहेत.